Mumbai: ओमायक्रॉनचं संकट, रात्रीच्या जमावबंदीची अमंलबजावणी सुरू,मुंबईत 11 नवे ओमायक्रॉनचे रूग्ण

आज ख्रिसमस आणि इथून पुढचे पाच दिवस जगभरात सेलिब्रेशन आणि पार्टीची धूम असणार हे वेगळं सांगायला नको.. पण तुम्ही जर पार्टी प्लॅन करत असाल तर जरा थांबा आणि ही बातमी पाहा... देशात ओमायक्रॉनचं संकट दिवसागणिक गहिरं होत चाललंय.... त्यातच नाताळ आणि नवववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी होणारी गर्दी लक्षात घेता राज्य सरकार सावध झालंय.... काल राज्य सरकारनं जारी केलेल्या नाईट कर्फ्यूची अंमलबजावणी सुरू झालेय. रात्री ९ ते ६ या काळात पाचपेक्षा अधिक जणांना एकत्र येता येणार नाहीये. या शिवाय खबरदारी म्हणून उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती मर्यादित करण्यात आलेय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola