Protest at Mumbai MSEB office: महावितरण कार्यालयासमोर ओबीसी नेते प्रकाश शेंडगेच्या नेतृत्वात आंदोलन
मुंबईतील वांद्रे येथील महावितरणच्या कार्यालयासमोर आज ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येतंय. मागील २ वर्षांपासून महावितरणमधील विद्युत सहाय्यक पदाची ५ हजार पदं रिक्त आहेत. ती पदं भरण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येतंय. या आंदोलनासाठी राज्यभरातून अनेक तरुण मुंबईत आलेत. महावितरण विभागानं तात्काळ नियुक्ती करण्याची मागणी या तरुण विद्यार्थ्यांची आहे.