Mumbai NCB : मुंबईत NCB कार्यालयासमोर अचानक आला NSG Commandos चा ताफा
Continues below advertisement
सध्या राज्यात राजकारण तापलंय ते म्हणजे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या ड्रग्ज प्रकरणात झालेल्या अटके मुळे. या प्रकरणला रोज वेगळे वळण मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी क्रूझवरील कारवाईत काही जणांना सोडल्याचा आरोप केला होता. NCB ने सुद्दा एक पत्रकार परीषद घेत नवाब मलिक यांचे सर्व आरोप फेटाळले. आता नवाब मलिक यांनी पुन्हा NCB ला त्यांनी सोडलेल्या तीन जणांचं फुटेज जाहीर करण्याच आव्हान दिलं आहे. अशातच आज NCB च्या मुंबई कार्यालया बाहेर अचानक NSG Commandos च्या गाड्यांचा ताफा आला. एकूण नऊ गाड्यांचा हा ताफा पाहाताच नागरिकही गोंधळून गेले. काही क्षणांनी समजलं की हा ताफा खर्या NSG चा नसून एका चित्रपटाच्या चित्रीकरणाचा भाग होता. परंतू सोशल मिडीयावर आता हा व्हिडीओ फार व्हायरल होत आहे.
Continues below advertisement