Mumbai Vande Bharat Local : ‘वंदे भारत’च्या धर्तीवर आता ‘वंदे भारत लोकल’ सुरू करण्याचे नियोजन
मुंबईकरांचा लोकल प्रवास आरामदायी करण्यासाठी आणि अपघात कमी करण्यासाठी भारतीय रेल्वे ‘वंदे भारत’च्या धर्तीवर आता ‘वंदे भारत लोकल’ सुरू करण्याचे नियोजन करत आहे. सध्या यावर प्राथमिक स्वरूपात रेल्वे बोर्डाचा अभ्यास सुरू आहे. लवकर यावर मोठी घोषणा होणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.‘मेड इन इंडिया’अंतर्गत तयार करण्यात आलेली ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस हिट ठरली आहे. आता रेल्वे बोर्डाकडून वंदे भारत मेट्रो ट्रेनची बांधणी सुरू करण्यात आली आहे. या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत वंदे मेट्रो ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील.
Tags :
Accidents Railways Railway Board Local Travel MUMBAI Comfortable Vande Bharat Vande Bharat Local