मुंबईत 31 डिसेंबरला रात्री 11 नंतर होम डिलिव्हरी नाही, शेवटची ऑर्डर रात्री साडेनऊ वाजता?
घरातच राहून नववर्षाचं स्वागत करण्याचा बेत आखणाऱ्यां मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. घरातल्या पार्टीसाठी ऑनलाईन फूडची ऑर्डर देणार असाल तर ती रात्री 9.30 वाजेपर्यंतच द्यावी, रात्री 9.30 वाजेपर्यंतच्या अशा प्रकारच्या ऑर्डर स्वीकारण्याचा निर्णय आहार ने घेतला असल्याचं आहारचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी सांगितलंय.कोरोनाच्या नव्या स्ट्रेनपासून असलेला धोका लक्षात घेता राज्य सरकारनं नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदा 9.30 पर्यंतच शेवटची ऑर्डर स्विकारण्याचा निर्णय आहारने घेतला आहे.