Diwali : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फटाकेमुक्त दिवाळी? राज्य सरकारकडून दिवाळीसाठी गाईडलाईन्स

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिवाळी सण साजरा करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दिवाळी प्रकाशाचा उत्सव म्हणून साजरा केला जावा, आवाजाचा उत्सव म्हणून नाही, असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, महाराष्ट्रात फटाकेबंदीवरुन कॅबिनेटमध्ये जोरदार चर्चा झाली.


दिवाळीच्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने जारी केल्या

  • कोरोना संदर्भात असलेल्या SOP चे पालन करावे
  • दिवाळीत प्रदूषण होऊ नये ही बाब विचारात घेऊन फटाके फोडणे टाळावे त्याऐवजी दिव्यांची आरास करून दिवाळी साजरी करावी.
  • दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजन करू नये, करायचे असल्यास ऑनलाइन आणि सोशल मीडिया माध्यमातून कार्यक्रम करावे.
  • सांस्कृतिक कार्यक्रमांच्या ऐवजी संस्थांनी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिरांवर भर दिला जावा.
  • धार्मिक स्थळ अद्याप खुली केलेली नाही, त्यामुळे सण घरगुती पद्धतीने सध्या स्वरूपात साजरा करावा.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola