Mumbai Power Cut | मुंबई, ठाण्यातील वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता : नितीन राऊत
मुंबई आणि उपनगरात सोमवारी (12 ऑक्टोबर) वीज पुरवठा खंडित झाल्याप्रकरणी राज्याचे ऊर्जमंत्री नितीन राऊत यांनी मोठा दावा केला आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असं नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलं आहे.