Nilesh Lanke Full PC : काही लोकांना त्यांचा झालेला पराभव मान्य नाही; लंकेंनी सुजय विखेंना सुनावलं

Nilesh Lanke Full PC : काही लोकांना त्यांचा झालेला पराभव मान्य नाही; लंकेंनी सुजय विखेंना सुनावलं

मी खासदार झाल्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. एका सामान्य कुटुंबातील शिवसैनिक खासदार झाला ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे, असे उद्धव साहेबांनी म्हटले. त्यांच्या मनात माझ्यासारख्या कार्यकर्त्याविषयी भावना होतीच, असे वक्तव्य अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी केले. निलेश लंके यांनी शनिवारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी निलेश लंके यांनी उद्धव ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा नगरमधून करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी आम्ही नगरमध्ये भव्य मेळाव्याचे आयोजन करु. मी उद्धव साहेबांची भेट घेतल्यानंतर त्यांना सांगितले की, साहेब मी नगरमधून 12 पैकी 12 आमदार निवडून आणण्याचा नारा दिला आहे. उद्धव साहेबांनी लोकसभा निवडणुकीत माझ्या प्रचारासाठी येता न आल्याबद्दल खंत बोलून दाखवल्याचे निलेश लंके यांनी म्हटले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola