Night Curfew Guidelines | संचारबंदीत घराबाहेर पडण्यास मुभा? मुंबई पोलीस म्हणतात...

Continues below advertisement

Night Curfew लागू केल्यानंतर या नियमांचं पालन करण्यास राज्यात सुरुवात झाली. विशेषत: हे नियम लागू करण्यात आल्यांनंतर मुंबईत याचे थेट परिणाम दिसून आले. ज्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये काही प्रमाणात संभ्रमही पाहायला मिळाला. रात्रीच्या वेळी असणारी संचारबंदी म्हणजे घराबाहेर पडायचंच नाही का, असा प्रश्नही अनेकांना पडला. ज्याबाबत आता पोलीस यंत्रणांकडून काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहेत.

मुंबईत संचारबंदी असली तरीही नागरिकांना घराबाहेर पडण्यास मुभा असल्याचं पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या निवेदनात सांगण्यात आलं आहे. बरं, बाहेर पडण्याची मुभा असली तरीही गर्दी करु नका असा इशाराही देण्यात आला आहे.

संचारबंदीदरम्यान चारपेक्षा अधिक जण कोणत्याही ठिकाणी जमल्याचं आढळून आल्याचं आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असाही इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. मुंबईचे सह पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी संचारबंदीच्या बाबतीच महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram