NIA Raids in Mumbai : मुंबईत दाऊदशी संबंधित 29 ठिकाणी एनआयएची छापेमारी सुरू ABP Majha
abp majha web team
Updated at:
09 May 2022 10:56 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मुंबईतील 29 ठिकाणांवर राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने छापे मारलेत. मुंबईतील नागपाडा, भेंडीबाजार, सांताक्रुझ, गोरेगाव, बोरीवली आणि मुंब्रा परिसरात सकाळपासून ही छापेमारी सुरु असल्याची माहिती समोर येतेय. डी कंपनीशी संबधित ड्रग्ज पेडलर्स, हवाला ऑपरेटर्स आणि शार्प शूटर्सच्या मालमत्तांवर हे छापे टाकण्यात आलेत.