NIA Raids in Mumbai : मुंबईत 20 ठिकाणी एनआयएची छापेमारी सुरू ABP Majha
Continues below advertisement
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मुंबईतील वीस ठिकाणांवर राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने छापे मारलेत. मुंबईतील नागपाडा, भेंडीबाजार, सांताक्रुझ, गोरेगाव, बोरीवली आणि मुंब्रा परिसरात सकाळपासून ही छापेमारी सुरु असल्याची माहिती समोर येतेय. डी कंपनीशी संबधित ड्रग्ज पेडलर्स, हवाला ऑपरेटर्स आणि शार्प शूटर्सच्या मालमत्तांवर हे छापे टाकण्यात आलेत. एनआयएने फेब्रुवारीत दाऊद इब्राहिम आणि त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर एनआयएकडून सातत्याने दाऊदशी संबंधित मालमत्तांवर कारवाई सुरु आहे. आजची कारवाईही त्याचाच एक भाग असल्याचे बोललं जातंय. या कारवाईतून आता एनआयएच्या हाती काय लागणार, याकडे लक्ष लागलंय.
Continues below advertisement