Devendra Fadnavis | कोरोना टेस्टिंगचं प्रमाण दुप्पटीने वाढवण्याची गरज : देवेंद्र फडणवीस

कोरोना टेस्टिंगचं प्रमाण वाढलं पाहिजे. टेस्टिंग वाढवलं नाही तर कोरोनाचं संक्रमण वाढत जाईल. सध्या अधिक व्हेंटिलेटरची गरज आहे. सरकारची व्हेंटिलेटर खरेदीची प्रक्रिया मंद गतीने सुरु आहे. एमएमआर रिजनमध्ये टेस्टिंगची व्यवस्था आणि आयसोलेशन तसेच उपचाराची व्यवस्था वाढवावी लागेल, कारण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई आणि पनवेलचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी कोरोनाच्या परिस्थितीची पाहणी केली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola