NCP Supporters Protest in Vartak Nagar : आव्हाडांना अटक केल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

Continues below advertisement

विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात प्रेक्षकाला मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आलीय. वर्तकनगर पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांना ताब्यात घेण्यात आलंय. सोबतच मारहाण प्रकऱणातील काही कार्यकर्त्यांनादेखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दरम्यान या प्रकरणात कारवाई करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला जात असल्याचं आव्हाड यांनी म्हटलंय..जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता... यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram