NCP Preparation for BMC 2022 | मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या तयारीला सुरुवात
मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादीनं मिशन २०२२ हाती घेतलंय. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आतापासूनच तयारीला लागलीय. मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं चुनाभट्टीतील सोमय्या मैदानावर आज दिवसभर कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचं आयोजन केलंय. या एकदिवस शिबिरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे अन्य नेते मार्गदर्शन करणार आहेत.