Jayant Patil : जयंत पाटलांविरोधात भाजपकडून एकही आरोप नाही, तर ईडीची नोटीस कशी येते?
Continues below advertisement
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची आज ईडी कार्यालयात सकाळी 11 वाजता चौकशी केली जाणार आहे. IL&FS प्रकरणी ईडी जयंत पाटील यांचा जबाब नोंदवणार आहे. मात्र, याप्रकरणाशी आणि आपला काहीच संबंध नसल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.. दरम्यान, जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीविरोधात आज मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठिय्या आंदोलनावर बसले आहेत.. तर बरेच पदाधिकारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.. मात्र पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबईला येऊ नये असं आवाहन जयंत पाटील यांनी ट्विटरवरून कार्यकर्त्यांना केलंय.
Continues below advertisement