Sameer Wankhede Enquiry : समीर वानखेडे यांच्या चौकशीसाठी मुंबईत आलेलं NCBचं पथक दिल्लीकडे रवाना

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी मुंबईत आलेलं एनसीबीचं दक्षता पथक आज दिल्लीकडे रवाना झालं आहे.  पंच प्रभाकर साईल यांच्या गौप्यस्फोटानंतर एनसीबी प्रमुखांनी चौकशीचे आदेश दिले होते. हे पथक प्रभाकर साईल आणि किरण गोसावी यांचा जबाब नोंदवू शकलं नाही. ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यांचं हे पथक मुंबईत आलं होतं.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola