SSR Case | ड्रग्ज प्रकरणात रिया-शौविक आणि सॅम्युअल मिरांडाच्या घरी NCB कडून झाडाझडती
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर संपूर्ण बॉलिवूड विश्व ढवळून निघालं आहे. अशातच याप्रकरणात तपास करणाऱ्या नार्कोटिक्स ब्युरोने ड्रग्ज कनेक्शनमध्ये तपास सुरु केला आहे. आज सकाळीच सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी आणि सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या घरी एनसीबीची दोन पथकं दाखल झाली आहे. ते रियाच्या घराची झडती घेणार आहे. एनसीबीने केलेल्या या कारवाईनंतर आता रिया चक्रवर्तीला सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अटक होणार का? अशा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे.