Aryan Khan Case : एनसीबीचं पथक शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर, आर्यनशी संबंधित कागदपत्रं जप्त
मागील 3 आठवड्यांपासून आर्यन खान एनसीबी कोठडी आणि तुरुंगवासात आहे. आणि थोड्यावेळापूर्वी तर एनसीबीचं पथक थेट बॉलिवूडच्या किंग खान शाहरुखच्या मन्नत बंगल्यावर पोहचलं. यावेळी शाहरुखच्या मॅनेजरकडून एनसीबीनी आर्यनशी संबंधित कागदपत्रं मागितल्याचं कळतंय. त्यात आर्यनच्या शैक्षणिक, आरोग्य विषयक कागदपत्रांचा समावेश आहे. याशिवाय, तो परदेशांमध्ये गेला असल्यास तिथलीही कागदपत्रं एनसीबीनं मागितल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, सकाळीचं शाहरुखने आर्थर रोड तुरुंगात जाऊन आर्यनची भेट घेतली आणि विचारपूस केली आहे.