Cruise Drugs प्रकरणात आतापर्यंत 18 जणांना बेड्या, कारवाई सुरूच राहणार, समीर वानखेडेंची माहिती

Mumbai Cruise Drugs Case : मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणी आर्यन खान आणि सात इतर आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आर्यन खानला कोठडी दिल्यानंतर आर्यन खानसह आठही जणांकडून जामिनासाठी अर्ज करण्यात आला. या आठही जणांच्या जामीन अर्जावर आज सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे. त्यामुळे आर्यन खानला जामीन मिळणार की, कोठडीत वाढ होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

 

क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आर्यन खानची एक दिवसाची कोठडी संपल्यानंतर सोमवारी पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी न्यायालयानं 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीची कोठडी सुनावणीत आली होती. ही कोठडी काल (7 ऑक्टोबर) संपली आहे. त्यामुळे आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचासह सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola