Nawab Malik : 'होय, मी भंगारवाला आहे, मला त्याचा अभिमान': नवाब मलिक
abp majha web team
Updated at:
30 Oct 2021 12:05 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आज पत्रकार परिषदेत चांगलेच आक्रमक झाले. समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि भाजपवर (BJP) गंभीर आरोप त्यांनी केले. यावेळी ते म्हणाले की, होय, मी भंगारवाला आहे. माझी 100 कोटींची औकात नाही. मी बँकांचे पैसे लुटले नाहीत. मी चेक बाऊंस केले नाहीत, माझ्या घरी CBIची रेड पडली नाही. वयाच्या सोळाव्या वर्षांपासून मी भंगारचा धंदा केला आहे, असं मलिक म्हणाले. त्यांनी म्हटलं की, माझं गोडाऊन आहे. माझ्या आजोबाने कुठल्याही डाकूकडून सोन घेतलं नाही. मी मुंबईत गोल्ड स्मगलिंग केलं नाही. मी भंगारवाला आहे. जी वस्तू उपयोगी नसते. त्याचे तुकडे करून पाणी करतो.