Sameer Wankhede : वानखेडे खोटे पुरावे देऊन तपासाला चुकीची दिशा देतायत, NCBचा गंभीर आरोप
Continues below advertisement
एनसीबीचे मुंबईचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे यांची आज सकाळच्या सत्रात सीबीआयने अडीच तास चौकशी केली. दुपारपर्यंतच्या चौकशीत वेगवेगळी माहिती पुढे आलीय. वानखेडेंनी शाहरुख खानसोबत केलेल्या चॅटची वरिष्ठांना कधीही माहिती दिली नव्हती, असा दावा एनसीबीने केलाय. हे चॅट वानखेडेंनी न्यायालयात सादर केल्यावर समजलं. तसेच समीर वानखडे यांनी खासगी व्यक्ती के. पी. गोसावी यांच्या संदर्भात उत्तर दिलेलं नाही, याकडेही एनसीबीने लक्ष वेधलंय. गोसावीवर गुन्हे असूनही त्याला तपासात सहभागी केल्याचं उत्तर दिलं नाही, असा दावाही एनसीबीने केलाय. तसेच खोटे पुरावे सादर करून वानखेडे तपासाला चुकीची दिशा देण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप एनसीबीने केलाय. दरम्यान सध्या लंचब्रेक झाला असून पुन्हा चौकशी सुरु करण्यात येणार आहे...
Continues below advertisement