Nawab Malik : नवाब मलिकांनी जामिनाची मुदतवाढ घेण्यास सुप्रीम कोर्टात जावं : मुंबई हायकोर्ट
abp majha web team
Updated at:
03 Jan 2024 02:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवाब मलिकांना तातडीचा दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिलाय. मलिकांनी जामिनाची मुदतवाढ घेण्यास सुप्रीम कोर्टात जावं असं हायकोर्टाने म्हटलंय. वैद्यकीय कारणांसाठी मलिकांना जामीन मिळालाय. मात्र त्यांच्या जामिनाची मुदत ११ जानेवारीला संपतेय. मलिकांनी हायकोर्टात मुदतवाढ देण्याची याचिका केलीय. हायकोर्टात जामीनासाठी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी 15 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आलीय. तोवर मलिकांना सुप्रीम कोर्टात जाण्याची मुभा आहे.