
Nawab Malik on Nitesh Rane : सेन्स ऑफ ह्युमर आणि घाणेरडेपणा यातील फरक काही लोकांना कळत नाही
Continues below advertisement
विधानभवनाची हास्यजत्रा केल्यानंतर राजकीय नेत्यांनी एकमेकांवर टीका करताना अतिशय खालची पातळी गाठली आहे.... सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि नितेश राणे यांच्या ट्विटची... अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी एका कोंबडीला मांजरीचा चेहरा मॉर्फ केलेला फोटो ट्विट केला आणि त्याला पेहचान कौन असं शीर्षक दिलं.. तर आज नितेश राणेंनी देखील मॉर्फ केलेला डुकराचा फोटो ट्विट केला आहे. आणि ही प्रजाती फक्त भंगारात आढळते असा मजकूर त्याला जोडलाय.. अशा हिडीस पद्धतीनं एकमेकांवर टीका करताना नेते महाराष्ट्राची राजकीय संस्कृती विसरलेत का असा सवाल सर्व स्तरातून विचारला जातोय. दरम्यान या प्रकरणांसह इतर मुद्द्यांवर नवाब मलिकांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी
Continues below advertisement