Cruise Drugs Case : समीर वानखेडेंविरेधात अनेक पुरावे मी हळूहळू बाहेर काढणार : Nawab Malik
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत एनसीबी आधिकारी समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळवल्याचा दावा केला आहे. काल ट्विटरवर जन्माच्या दाखल्याचं प्रमाणपत्र प्रसिद्ध केलं होत, त्यामधून बऱ्याच गोष्टी समोर आल्या. मी काही हिंदू-मुस्लीमचा मुद्दा घेऊन प्रकरण पुढे आणत नाही. आर्यन खान मुस्लीम असल्यामुळे नवाब मलिक या लढाईत उतरल्याचं भाजप सतत आरोप करत आहे. पण माझ्या 35 वर्षांच्या राजकारणात मी कधीही जातीचं राजकारण केलं नाही. हे लोकांना चांगलं माहित आहे. वानखेडे यांनी एका मागासवर्गीय समाजातील मुलाची नोकरी खाल्ली आहे. त्यासाठी खोटी प्रमाणपत्रं सादर केली आहेत. मी आजही माझ्या दाव्यावर ठाम आहे. समीर वानखेडे यांचा मी दिलेला जन्माचा दाखला खरा आहे. त्यावर वानखेडेंच्या वडिलांचं नाव दाऊद आहे. वानखेडेंच्या बहिणीचं सर्टिफिकेट ऑनलाइन मिळतेय. मात्र हे सर्टिफिकेट ऑनलाइन मिळत नाही. आम्ही रजिस्टर चेक केले. दीड महिने आम्ही हा कागद शोधत होतो. तेव्हा हे स्कॅन डॉक्युमेंट मिळालं. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे.