Nawab Malik PC : Aryan Khan क्रूझवर यावा म्हणून Mohit Kamboj यांनी षडयंत्र रचलं : नवाब मलिक

Continues below advertisement

Mumbai Drugs case updates : आर्यन खानच्या (Aryan Khan) किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज असल्याचा मोठा आरोप मंत्री नवाब मलिकांनी (Nawab Malik Press)केला आहे.  कोर्ट प्रोसिडिंगमध्ये एक बाब वारंवार समोर आली आहे की प्रतीक गाभा आणि अमीर फर्निचरवाला यांच्या माध्यमातून आर्यनला क्रूझवर आणण्यात आलं. हे सगळं प्रकरण किडनॅपिंग आणि खंडणी वसुली करण्याचं आहे. किडनॅपिंगचा मास्टर माईंड मोहित कंबोज (Mohit Kamboj) आहे. मोहित कंबोज हा आपलं हॉटेल चालवण्यासाठी शेजारी असणाऱ्या हॉटेलवर छापेमारी घडवून आणतो. यामध्ये समीर वानखेडे (Sameer Wankhede) त्याला मदत करतो, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. 

नवाब मलिक यांनी म्हटलं की, 7 तारखेला मोहित कंबोज आणि समीर वानखेडे ओशिवरा कब्रस्तान येथे भेटले होते. त्यांचं नशीब चांगलं होतं की त्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ मिळाला नाही. वानखेडे यांना सांगू इच्छितो की मी कोणाला पाठ करून पत्रकार परिषदेसाठी पाठवत नाही, असंही ते म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram