Nawab Malik on Cruise : Aryan Khanच अपहरण करून 25 कोटींची मागणी, मोहित कंबोज यांच्यावर मलिकांचा आरोप

Mumbai Drugs case updates : आर्यन खानच्या (Aryan Khan) किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज असल्याचा मोठा आरोप मंत्री नवाब मलिकांनी (Nawab Malik Press)केला आहे.  कोर्ट प्रोसिडिंगमध्ये एक बाब वारंवार समोर आली आहे की प्रतीक गाभा आणि अमीर फर्निचरवाला यांच्या माध्यमातून आर्यनला क्रूझवर आणण्यात आलं. हे सगळं प्रकरण किडनॅपिंग आणि खंडणी वसुली करण्याचं आहे. किडनॅपिंगचा मास्टर माईंड मोहित कंबोज (Mohit Kamboj) आहे. मोहित कंबोज हा आपलं हॉटेल चालवण्यासाठी शेजारी असणाऱ्या हॉटेलवर छापेमारी घडवून आणतो. यामध्ये समीर वानखेडे (Sameer Wankhede) त्याला मदत करतो, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola