Nawab Malik Bail : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची थोड्याच वेळात सुटका होणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आलाय.. मलिकांच्या जामीन अर्जावर काही वेळापूर्वीच सुनावणी पार पडली.. 6 अटीशर्थींसह मलिकांना जामीन मंजूर करण्यात आलाय.. थोड्याच वेळात मलिक क्रिटी केअर रुग्णालयातून बाहेर पडतील... प्रकृतीचं कारण देत वैद्यकीय जामीन मिळावा अशी याचिका नवाब मलिक यांनी केली होती. मलिकांची ही मागणी सुप्रीम कोर्टाने गेल्या आठवड्यात मान्य केलीये. या जामिनाची प्रक्रिया आज पूर्ण झालीये.... गोवावाला कंपाऊंडमधील मनी लाँडरिंगप्रकरणी नवाब मलिकांना ईडीने 23 फेब्रुवारी 2022 ला अटक केली होती.