Navneet Rana vs Shiv Sena : तक्रारीसाठी राणा आज दिल्लीत, तर मुंबई पालिकेचं पथक राणांच्या घरी धडकणार
Continues below advertisement
राणा विरुद्ध शिवसेना यांच्यातला वाद पुन्हा तीव्र होण्याची चिन्हं आहेत. कारण जेलमधून बाहेर आलेलं राणा दाम्पत्य आज दिल्लीत जाऊन तक्रार करणार आहेत. तर दुसरीकडे बीएमसीचं पथक आज नवनीत राणा यांच्या मुंबईतील खारमधील निवासस्थानी जाऊन त्यांच्या घरात झालेल्या कथित बेकायदा बांधकामाची तपासणी करण्याची शक्यता आहे. नवनीत आणि रवी राणा आज सकाळी दिल्लीला रवाना होणार आहेत. तिथं ते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन पोलीस ठाण्यात आणि जेलमध्ये वाईट वागणूक मिळाल्याची तक्रार करणार आहेत. बीएमसीचं पथक आज पुन्हा एकदा राणा यांच्या घरी जाण्याची शक्यता आहे. याआधी दोन वेळा बीएमसीचे अधिकारी राणांच्या घरी बेकायदा बांधकामाची पाहणी करण्यासाठी गेले होते, पण घर बंद असल्यानं नोटीस देऊन ते परतले.
Continues below advertisement