Panvel Lockdown | पनवेल मनपा क्षेत्रात आजपासून 10 दिवस लॉकडाऊन,अत्यावश्यक सेवा वगळता शहर पूर्ण बंद
पनवेलमधील कोरोना पाॅझिटिव्ह संख्या लाॅकडाऊन शिथील केल्यानंतर वाढल्याचे समोर आले आहे. दिवसाला 200 पर्यंत कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण वाढत असल्याने दोन्ही शहरात लाॅकडाऊन करण्याचा निर्णय मनपा आयुक्तांनी घेतला आहे. आज रात्री 12 वाजल्यापासून 13 तारखेच्या रात्री 12 वाजेपर्यंत हा लाॅकडाऊन राहणार आहे. अत्यावश्यक सेवा सोडून बाकी सर्व व्यावहार बंद राहतील.