Navi Mumbai to Mumbai Water Transport : नवी मुंबई ते मुंबई जलवाहतूक लवकरच ABP Majha

नवी मुंबई शहराच्या शिरपेचात लवकरच आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. कारण येत्या सहा महिन्यात नवी मुंबईतून जलवाहतूक सेवा सुरु होणार आहे. नेरुळ येथील खाडीमध्ये भव्य टर्मिनस उभं करण्याचं काम प्रगतीपथावर आहे. या ठिकाणावरून गेट वे ऑफ इंडिया, भाऊचा धक्का , मांडवा, अलिबाग,  ठाणे , उरण , वसई विरार आदी भागात सेवा सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे नवी मुंबईकरांना २० मिनिटात मुंबईत  तर अलिबाग येथे एक तासाच्या आत पोचतां येणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola