नवी मुंबई : शिवसेनेच्या 15 गाड्या पूरग्रस्तांच्या मदतीला, कपडे, भांडी, शेगडीसह अनेक वस्तूंचा समावेश
Continues below advertisement
कोकणातील महाड आणि चिपळूण शहरात आलेल्या महापुरामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. होत्याचे नव्हते झाल्याने लोकांच्या आयुष्यात अंधारमय स्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीतून लोकांना सावरण्यासाठी , आधार देण्यासाठी नवी मुंबई , ठाणे शिवसेनेकडून मोठी मदत पुरविण्यात येत आहे. शिवसेना खासदार राजन विचारे यांच्या माध्यमातून ठाणे , नवी मुंबई शहरातून 15 गाड्या मालाच्या रवाना करण्यात आल्या. यामध्ये कपडे , भांडी, शेगडी, जीवनावश्यक वस्तू आदींचा समावेश आहे. त्याचबरोबर पुरामुळे सर्वत्र घाण पसरल्याने ती साफ करण्यासाठी नवी मुंबई मनपाचे 50 साफसफाई कर्मचारी, आरोग्य तपासणी करण्यासाठी डॉक्टर पथक , चार ॲम्ब्युलन्सचासुध्दा या ताफ्यात समावेश करण्यात आला आहे. महाड आणि चिपळूणमध्ये जाऊन शिवसैनिक लोकांच्या मदतीसाठी उतरणार आहेत.
Continues below advertisement
Tags :
Shivsena Maharashtra Flood Navi Mumbai Rajan Vichare MP Rajan Vichare Flood Help Flood Rescue