Navi Mumbai : नवी मुंबईकरांनो सावधान! 31 डिसेंबरनिमित्त सोसायटीत पार्टीचा बेत आखणं पडेल महागात
थर्टीफस्ट निमित्त सोसायटीत पार्टीचा बेत आखणं आता महागात पडणार आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंग यांनी दारू पिणारे आणि दंगा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार आहेत. त्याच बरोबर अटकेची कारवाई सुध्दा होवू शकते असे सांगीतले आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाल्याने महानगरपालिका आणि पोलीसांकडून निर्बंध घालण्यास सुरवात झाली आहे. सोबतच रात्री मध्यपान करून रस्त्यांवर गाडीने राऊंड मारणाऱ्या मध्यपिणाऱ्यांवर सुध्दा चाप लावण्यात येणार आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर आणि चौकात पोलीस बंदोबस्त मोठ्या संख्येने ठेवला जाणार आहे.