Lockdown | नवी मुंबईत बँकांबाहेर गर्दी, जनधन योजनेचे पैसे काढण्यासाठी रांगा
Continues below advertisement
गेल्या तीन दिवसापासून बॅंका बंद असल्याने सर्वसामान्यांना याचा चांगलाच त्रास सहन करावा लागला होता. मात्र आज बॅंक सुरु होताच पैसे काढण्यासाठी, पेन्शनचे पैसे घेण्यासाठी, पंतप्रधानांकडून आलेल्या पैशावर घरचे सामान भरता येईल म्हणून लोकांनी गर्दी केली होती. विशेषता वयोवृद्ध लोकांची रांगेत गर्दी जास्त दिसत होती. त्यांना एटीएममधून पैसे काढण्याचे किंवा आॅनलाईन व्यावहार करण्याची पूर्ण माहिती नसल्याने त्यांची पूर्ण भिस्त ही बॅंकेतून पैसे काढण्यावर होती. लाॅकडाऊन सुरु असल्याने अनेकांच्या जवळील पैसे संपले आहेत. त्यामुळे पंतप्रधानांनी आपल्या खात्यात पैसे टाकलेत का याची खातरजमा करुन ते काढण्यासाठी बॅंकेच्या बाहेर रांगा लागल्या होत्या.
Continues below advertisement