Navi Mumbai | भाजपचं राज्य अधिवेशन नवी मुंबईत, राज्यभरातून 10 हजार कार्यकर्त्यांची हजेरी | ABP Majha
राज्यातील सत्ता गमावल्यानंतर भाजपने महापालिका निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांचं राज्यव्यापी अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. नवी मुंबईत दोन दिवस म्हणजे 15 आणि 16 फेब्रुवारीला हे अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. या राज्यव्यापी अधिवेशनाला 10 हजारहून अधिक भाजप पदाधिकारी सामील होतील, असा दावा भाजपने केला आहे.