Jitendra Awhad | गणेश नाईक नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर, जितेंद्र आव्हाडांची टीका
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. गणेश नाईक हे नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर आहेत. राजकीय महत्वाकांक्षेपोटी त्यांनी मुलाला भाजपमध्ये पाठवून त्याचा बळी दिल्याची जहरी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. येत्या एप्रिल महिन्यात नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होतेय. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कोपरखैरणेत पार पडलेल्या सभेत आव्हाड यांनी गणेश नाईकांवर जोरदार हल्लाबोल केला.