Rohit Pawar | आमदार रोहित पवार यांची पहाटे चार वाजता नवी मुंबई एपीएमसी मार्केटला भेट
Continues below advertisement
नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची आज पहाटे चार वाजता नवी मुंबईतील एपीएमसीमधील भाजी मार्केटला भेट दिली. यावेळी त्यांनी माथाडी कामगार, व्यापारी वर्गाच्या समस्या जाणून घेतल्या. "केंद्र सरकारने राज्य सरकारवर कृषी कायदा लादला आहे. पण राज्य सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेईल," अशी ग्वाही रोहित पवार यांनी यावेळी दिली.
शेतकरी वर्गाच्या संरक्षणासाठी एपीएमसी मार्केटची गरज असल्याचं रोहित पवार यांनी नमूद केलं. सोबतच दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत भाजपची भूमिका हुकूमशाहीची असल्याचं ते म्हणाले.
यावेळी महाराष्ट्रातील काही नेत्यांच्या होत असलेल्या ईडी चौकशीबद्दल रोहित पवार म्हणाले की, "उद्या मलाही ईडी नोटीस पाठवेल. ईडीच्या माध्यमातून भाजपकडून विरोधकांना लक्ष्य केले जात आहे."
Continues below advertisement