CM Eknath Shinde Dasara Melava 2023 : शिवसैनिकांच्या जेवणाची सोय वाशीमध्ये, शिंदे गटाचा मेळावा

Continues below advertisement

बुलेटीनच्या सुरुवातीला बातम्या आजच्या तीन दसरा मेळाव्यांची... मुंबईत दोन मैदानावर दोन मेळावे आणि दोन प्रमुख नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत... दादरच्या शिवाजी पार्कातून परंपरेनुसार उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधणार आहेत... तर दुसरीकडे आझाद मैदानावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा असणार आहे... शिवसेनेत दोन गट पडल्यानं आता कार्यकर्ते आपआपल्या नेत्याचं भाषण ऐकण्यासाठी रवाना झालेत...  मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक येण्यास सुरुवात झालीए.  आझाद मैदानावर तब्बल सव्वा लाख कार्यकर्त्यांसाठी खुर्च्यांची सोय करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, बीडच्या सावरगाव येथेही पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होणारेय... महाराष्ट्रभर शिवशक्ती यात्रा काढल्यानंतर पंकजा मुंडेंचा हा मेळावा होतोय. दरम्यान, उद्धव ठाकरेंची मशाल कुणाला धग देणार, तसेच, एकनाथ शिंदे धनुष्यातून कुणावर बाण सोडणार आणि पंकजा मुंडे मनातली खदखद मांडत कुणाला लक्ष्य करणार याकडे सगळ्यांचे डोळे लागलेय.  दरम्यान शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांच्या नाश्त्याची आणि जेवणाची सोय वाशीत करण्यात आलीये...
दरम्यान वाशीमधून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram