Land Scam | प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक भूपेंद्र शहाला अटक | ABP Majha

Continues below advertisement
न्हावा शेवातील जमीन घोटाळा प्रकऱणी नवी मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक भूपेंद्र शहांना अटक करण्यात आलीय. शेतकरी असल्याच्या बनावट दाखल्याद्वारे शहांनी 600 कोटींची 80 एकर जमीन लाटल्याचा आरोप आहे. शेतजमीन विकत घेण्यासाठी भूपेंद्र शहांनी लातूर येथून शासकीय यंत्रणेला हाताशी पकडून बनावट शेतकरी असल्याचा दाखल मिळवला होता. याच दाखल्याच्या सहाय्यानं भूपेद्र शहांनी उरण येथील 80 एकर जागा विकत घेतली. याबाबत तक्रारी आल्यानंतर नवी मुंबई पोलीसांनी अधिक तपास केला असता बनावट दाखल्याचे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी नवी मुंबईतील भूमी बिल्डर्स ग्रुपचे मालक प्रसिध्द बिल्डर भूपेंद्र शहा याच्यासह तीन आरोपींना अटक केली आहे.


Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram