Lockdown 3 | Navi Mumbai APMC मुळे 200 हून अधिकांना कोरोना संसर्ग, आजपासून एक आठवडा मार्केट बंद
Continues below advertisement
वाशी एपीएमसीमुळे 220 ते 230 कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची भर पडली आहे. एपीएमसीमधील रूग्ण वाढीमुळे नवी मुंबईकरांनी रोष व्यक्त होत त्वरीत बंद करण्याची मागणी केली होती. यावर आता सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत पुढील एक आठवडा एपीएमसी मधील भाजीपाला, कांदा, बटाटा, फळं, मसाला, दाना मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एक आठवडा मार्केट बंद केल्यानंतर या दरम्यान कामगार, व्यापारी, ट्रान्सपोर्टर अशी 18 ते 20 हजार जणांची स्किनिंग करण्यात येणार आहे. यात ज्यांना लक्षणे आढळतील त्यांना मार्केटमध्ये प्रवेश बंदी केली जावून त्यांचे कोरोना टेस्ट केल्या जाणार आहेत.
Continues below advertisement