राज्यपालांवर कोणताही राजकीय दबाव असू नये, ते कोणत्याही एका पक्षाचे नाहीत हे भान ठेवावं : Nawab Malik

Continues below advertisement

मुंबई : विधान परिषदेवरील 12 नामनियुक्त सदस्यांच्या निवडीचा पेच कायम राहणार अशी चिन्ह आहेत. कारण मुंबई उच्च न्यायालयानं निकाल जाहिर केल्यानंतरही परिस्थितीत सध्यातरी काहीही फरक पडलेला नाही. 19 जुलै रोजी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठानं राखून ठेवलेला आपला निकाल शुक्रवारी जाहीर केला. मात्र, या निकालातनं हायकोर्टानं राज्यातील राजकीय परिस्थितीवर थेट बोट ठेवलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram