Lockdown 2 | नर्मदा परिक्रमेसाठी गेलेले जवळपास 100 भाविक मध्यप्रदेशात अडकले
नर्मदा परिक्रमेसाठी गेलेले महाराष्ट्रातील जवळपास 100च्या आसपास भाविक सध्या मध्यप्रदेशातील गोमुख घाट, ओंकारेश्वर, अमरकंठक या ठिकाणी अडकून पडले आहेत. यातील काही भाविक सहा महिन्यांपूर्वी तर काही भाविक दोन महिन्यांपूर्वी नर्मदा परिक्रमेसाठी घरातून बाहेर पडले होते. यामध्ये 30 ते 70 वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे. सध्या त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आम्हांला महाराष्ट्रात आणण्यासाठी विनंती केली आहे.