Naresh Mhaske : ठाकरे गटाने बनावट शपथपत्रं बनवली, शिंदे गटाचे नरेश म्हस्केंचा आरोप

एकीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने तूर्तास शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह तूर्तास गोठवलंय.. शिवसेना नावही ठाकरे आणि शिंदे गटाला वापरता येणार नाही. निवडणूक आयोगातील या लढाईसाठी दोन्ही गटाकडून शपथपत्रं सादर करण्यात आली होती. मात्र या शपथपत्रांबाबत मुंबईतून एक धक्कादायक माहिती समोर आलीय.. स्टॅम्पपेपरचा वापर करुन बनावट शपथपत्रं बनवल्याची धक्कादायक बाब उघड झालीय. नोटरी करणाऱ्यांनीच ही शपथपत्रं बनवलीत.. मुंबईतील निर्मलनगर पोलिसांनी ४ हजार ६८२ बनावट शपथपत्रं जप्त केलीत. ठाकरे गटाने ही बनावट शपथपठत्रं बनवल्याचा आरोप शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी केलाय.. या प्रकरणी निर्मलनगर पोलिसांत गुन्हा दाखल झालाय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola