माथाडी कामगारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करा, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांची मागणी

Continues below advertisement

सरकारने अत्यावश्यक सेवेतून वगळल्याने कामावर येण्यास अडचणी निर्माण होत आहेत. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसराला जीवनावश्यक वस्तू पुरवण्यास एपीएमसी मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या एपीएमसी मार्केट मध्ये येण्यासाठी माथाडी कामगारांना मात्र रेल्वेतून प्रवास करून दिला जात नसल्याने कामावर जायचे कसे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आज कामावर येणार्या माथाडी कामगारांना सानपाड़ा रेल्वे स्टेशन वर मज्जाव करण्यात आला. यानंतर माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी सानपाड़ा रेल्वे स्थानकात जाऊन रेल्वे अधिकारी यांची भेट घेतली. सरकारने अत्यावश्यक सेवेत माथाडी कानगारांना समाविष्ट न केल्यास उद्या पासून एपीएमसी बंद करण्याचा इशारा नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram