Narayan rane Vs Shiv Sena : नारायण राणेंंच्या जुहूमधील बंगल्याबाहेर शिवसैनिक-भाजप कार्यकर्ते भिडले

Continues below advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल नारायण राणेंनी केलेलं वक्तव्य, त्यानंतर राणेंना अटक करण्याचे नाशिक, पुणे पोलिसांचे आदेश यानंतर शिवसेना आणि भाजप आमनेसामने आलेत. राणेंची जनआशीर्वाद यात्रा आज चिपळूणमध्ये असल्यानं तिथं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने असल्यानं पोलिसांनी आंदोलकांना रोखलं. तर दुसरीकडे मुंबईत नारायण राणे यांच्या जुहू इथल्या निवासस्थानासमोरही शिवसैनिक आंदोलनासाठी जमले. त्यानंतर भाजपचे कार्यकर्तेही त्या ठिकाणी जमू लागल्यानं पोलिसांनी तिथं कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram