Nitesh Rane on ST workers Strike : सोनिया गांधीसमोर वाकून वाकून मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा; नितेश राणेंची शेलकी टीका

Continues below advertisement

Nitesh Rane on CM Uddhav Thackeray ST workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात राज्य सरकारवर टीका करताना भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची पुन्हा एकदा जीभ घसरली. नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आजारापणावरून टीका केली.  मुख्यमंत्र्यांना उगाच मानेला पट्टा लागला नाही, सोनिया गांधींसमोर वाकून वाकून त्यांच्या मानेला पट्टा लागला असल्याची शेलकी टीका नितेश राणे यांनी केली. आझाद मैदानात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात बोलताना नितेश राणे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही टीका केली. 

यावेळी नितेश राणे (Nitesh Rane) यांनी  एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी एक दिवसाचे विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले. एसटीच्या विलीनीकरणाच्या विधेयकाला आम्ही एकमुखी पाठिंबा देऊ असेही नितेश राणे (Nitesh Rane) यांनी म्हटले. भाजप आंदोलन पेटवत असल्याचा  आरोप परिवहन मंत्री अनिल परब यांनी केला होता. त्यावर बोलताना राणे यांनी मागील आठ वर्षांपासून शिवसेनेकडेच हे खाते होते याची आठवण करून दिली. हे कर्मचाऱ्यांचेच आंदोलन असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले. कोरोना काळात मुख्यमंत्री घरात बसून होते, त्यावेळी माझा कामगार एसटी घेऊन रस्त्यावर होता असेही नितेश राणे यांनी म्हटले.

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram