Raj Thackeray Meet Narayan Rane: नारायण राणे यांची सपत्नीक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सपत्नीक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतलीय. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही भेट झालीय. राणे आणि राज ठाकरेंची ही सदिच्छा भेट असल्याची चर्चा आहे. मात्र चर्चेचा तपशील गुलदस्त्यात आहे. गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर नारायण राणे आणि राज ठाकरेंच्या भेटीने लक्ष वेधलंय.
Tags :
Visit MNS President Narayan Rane Narayan Rane Raj Thackeray Shivtirtha Residence Goodwill Visit Spouse Discussion Details