Narayan Rane | हात धुवा सांगण्यापलीकडे सरकार काही करत नाही : नारायण राणे

"शिवसेनेने हिंदुत्व सोडले आहे, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची?" असा घणाघात भाजपचे नेते नारायण राणे यांनी केला आहे. "ठाकरे सरकारची साधूसंताना न्याय देण्याची इच्छा नाही आहे," असेही नारायण राणे म्हणाले. पालघर साधू हत्याकांड प्रकरणी भाजपचे आमदार राम कदम यांनी जनआक्रोश यात्रेचं आयोजन केलं होतं. परंतु यात्रा सुरु होण्यापूर्वीच मुंबई पोलिसांनी राम कदम यांना ताब्यात घेतलं. त्यांची सुटका घेतल्यानंतर भाजपचे नेते नारायण राणे यांनी राम कदम यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola