Nalasopara : AC Local चं दार न उघडल्यानं प्रवाशांचा गोंधळ, नालासोपाऱ्यात प्रवासी संतप्त ABP Majha

Nalasopara : AC Local चं दार न उघडल्यानं प्रवाशांचा गोंधळ, नालासोपाऱ्यात प्रवासी संतप्त ABP Majha

विरार : काल रात्री नालासोपारा   रेल्वे स्थानकात एसी लोकलचे दरवाजे न उघडल्याने नालासोपारा चे प्रवासी थेट विरारला पोहचल्याची माहिती समोर आली आहे.  तेथे प्रवाशांनी अर्धा तास गोंधळ घातला  होता.  काल सोमवार रात्री ११.१६ ला नालासोपारा रेल्वे  स्थानकात चर्चगेट हून येणारी एसी लोकलचे  दरवाजे तांत्रिक  कारणामुळे  उघडले गेले नाहीत. फक्त गार्डच्या बाजूचे तीन दरवाजे उघडले. आणि बाकीचे नऊ दरवाजे उघडलेच गेले नाहीत. त्यामुळे नालासोपाराचे प्रवासी थेट विरार रेल्वे स्थानकात पोहचल्याने नालासोपारा प्रवाशांनी एसी लोकल च्या ड्रायव्हरच्या केबिन समोर अर्धा तास गोंधळ घातला.
शेवटी १२.१५ ची शेवटची  विरार चर्चगेट लोकल ने प्रवासी नालासोपारा रेल्वे स्थानकात पोहचले. या गोंधळामुळे शेवटची लोकल ही उशिराने सुटली होती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola