Drug Case | ड्रग्ज प्रकरणी नायजेरियन प्राध्यापक एनसीबीच्या ताब्यात; बॉलिवूड कनेक्शन असल्याचा संशय
मुंबई : ड्रग्ज पुरवणाऱ्या एका नायजेरियन प्राध्यापकाला एनसीबीनं अटक केली आहे. मुंबई एनसीबीनं नालासोपारा येथे छापा टाकून नवागवू प्रिंसविल चीका या नायजेरियन नागरिकाला अटक केली आहे. तसेच हा प्राध्यापक बॉलिवूडमध्येही ड्रग्स पुरवत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.