Mva Protest : सरकारचा प्रतिकात्मक पुतळा, मविआचे आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात

Continues below advertisement

Mva Protest : सरकारचा प्रतिकात्मक पुतळा, मविआचे आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात

मुंबई :  शिवद्रोही सरकारविरोधात आम्ही जोडे मारो  (Maha Vikas Aghadi Protest) आंदोलन करणार आहे.  आंदोलनाला आंदोलनानं प्रत्युत्तर देणं हा भाजपचा (BJP)  मूर्खपणा असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय  राऊतांनी केला आहे. आम्ही फक्त जोडे मारो करतोय , शिवाजी महाराजांच काळ असता तर तुमचा कडेलोट केला असता, असे देखील संजय राऊत म्हणाले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. 

संजय राऊत म्हणाले,  या सरकारमध्ये वारंवार शिवाजी महाराजांचा अपमान होतो. राज्यपाल कोश्यारी यांनी अपमान केला, माफी मागितली नाही.  मंत्र्यांनी अपमान केला माफी मागितली नाही.  सध्याचे केसरकर म्हणतात दुःख कशाला करायचे वाईटातून चांगले घडते . ही विकृती आहे. भ्रष्टाचाराची  स्पर्धा सुरू आहे. प्रधानमंत्र्यांनी माफी मागितली असेल त्यांचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री असतील, अजित पवार असतील माफी मागितलं असेल . पण महाराष्ट्र ला संताप व्यक्त करायचा असेल तर तुम्ही थांबवू शकत नाही.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram